जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते कोंदावाही येथे समाज मंदिराचे भूमिपूजन

374

The गडविश्व
एटापल्ली, २ ऑक्टोबर : तालुक्यांतील कोंदावाही येथे जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते समाज मंदिराचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले.
कोंदावाही येथे काटवली देवी असून परिसरातील समाजबांधव या ठिकाणी पूजा अर्चना करत असतात मात्र येथे थांबण्यासाठी समाज मंदिर नसल्याने प्रत्येक वर्गातील समाजबांधवांना अडचण भासत होती. अजय कंकडालवार हे जि.प. अध्यक्ष असताना सदर गावातील नागरिकांनी समाज मंदिर बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. कंकडालवार यांनी जिल्हा परिषदेच्या १५ व्या वित्त आयोगातून निधी प्राप्त नाही नाही. समाज मंदिरसाठी निधी उपलब्ध करून देतो अशी ग्वाही दिली होती व निधी प्राप्त होताच प्रथम प्राधान्याने काम मंजूर करण्यात आल्याने आज जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते समाज मंदिर कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

 

यावेळी भूमिपूजन कार्यक्रमाला उड़ेरचे पोलीस पाटील अजय गावडे, सुनीता अजय गावड़े सदस्य, उड़ेराचे सरपंच गणेश गोटा, अनिल कर्मरकर, सी पी वेलादी, महेश बीरमवार, दादा बिडरी, प्रकाश वेलादी, संतोष बीरमवार पैमा, कोलू दादा पैमां, बंडू तलांडे कोंदावाही, राकेश देवताड़े, राहुल बीरमवार, उपसरपच बापू गावड़े सह शेकड़ो कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here