– पूसुकपली वासियांना मिळणार शुद्ध पिण्याचे पाणी
The गडविश्व
अहेरी, १९ सप्टेंबर : तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय नागेपली अंतर्गत येत असलेल्या पुसुकपली येते १५ व्या वित्त जिल्हा परिषद स्तर गडचिरोली अंतर्गत शुद्ध पिण्याच्या पाण्याचे जलशुद्धिकरण केंद्र मंजूर करण्यात आले आहे. सदर जलशुद्धिकरण केंद्र बांधकामाचे भूमिपूजन नुकतेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.
पुसूकपली वासियांनी शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे म्हणून जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे मागणी केली असता जिल्हा परिषद गडचिरोली १५ व्या वित्त मधून निधी मंजूर करण्यात आले व भूमिपूजन संपन्न झाले.
यावेळी नागेपलीचे सरपंच लक्ष्मण कोडापे, अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, अहेरीचे स्वीकृत नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, ग्राम पंचायत सदस्य रेड्डी सावकार, ग्राम पंचायत सदस्य राकेश कूळमेथे, शेवंता भोयर, शा.व्य.स.अध्यक्ष रामदास चौधरी, श्रीनिवास भोयर, सुरेश चौधरी, शामराव डोके, रमेश भोयर, प्रमोद भोयर, शंकर अत्कूलवार, व्येंकटेंश रेगुंडी, गंगाराम येलूर, प्रमोद गोडसेलवार, गावातील महिला व नागरिक उपस्थित होते.