जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते फुटबॉल स्पर्धेचे बक्षीस वितरण

197

– आदर्श क्लब श्रीनगर यांच्या वतीने भव्य फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

The गडविश्व
मूलचेरा, १६ सप्टेंबर : तालुक्यातील श्रीनगर येथे आदर्श क्लब तर्फे फुटबॉल स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेचे बक्षिस वितरण नुकतेच जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला, दूसरा असे दोन पुरस्कार या ठिकाणी देण्यात आले आहे.

बक्षिस वितरण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प.सदस्य शरविंद्र शहा,अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, सुंदरनगरचे उपसरपंच संजय सरकार, ग्रा.पं.सदस्य बबलू शेख, व्यापरी, कमलेश सरकार, पोलीस पाटील आशाताई सरदार, सुनील सरकार, भा.ज.पा.युवा मोर्चा ता.उपाध्यक्ष किशोर मल्लिक, मौहूर्लीचे ग्रा.प.सदस्या सुनंदा सिडाम, दिशा नैताम, राबिन मिस्त्री, रणजीत काका, सुकुमार दास आदि उपस्थित होते.

यावेळी प्रथम विजेता संघ गणेशनगर तर उपविजेता संघ भवानीपूर यांना पारितोषिक व शिल्ड मान्यवराच्या हस्ते देण्यात आले. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे संचालन संजय बिश्वास आभार अमर दास यांनी केली. यावेळी खेळाडू व गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here