The गडविश्व
अहेरी, ९ सप्टेंबर : तालुक्यातील रेपनपली येथे सण २००५ पुर्वी अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांना वनविभागाकडून जीपीआरएस नकाशा देण्यात येत आहेत. मात्र नकाशा सत्यप्रतित देत नाहीत त्यामुळे अडचण निर्माण होत होती. त्यामुळे आज रेपनपली येथील वन हक्क धारक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या निवासस्थानी भेट घेवून यांबाबत सविस्तर चर्चा केली.
यावेळी जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी तोडगा काढण्यात येईल असे सांगत धीर दिला. यानंतर तुम्हाला पुन्हा अर्ज करण्याची संधी मिळेल याची काही शास्वती नाही असेहि ते म्हणाले तसेच वैयक्तीक वन हक्क दाव्याचे अर्ज कसा भरायचे हे सुध्दा शेतकऱ्यांना यावेळी समजावून सांगण्यात आले.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, माजी जि.प.सदस्य अजय नैताम व रेपनपली येथील कार्यकर्ते उपस्थित होते.