The गडविश्व
अहेरी, २३ जुलै : तालुक्यांतील रेपनपली ग्राम पंचायत अतंर्गत येत असलेल्या भिमरगुडा येथे जि.प माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी भेट देऊन पूर पीडीत असलेल्या नागरिकांसोबत चर्चा केली व शासनाकडून त्वरित नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच पुराच्या पाण्यात घरातील जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्याने व सतत चालू असलेल्या पावसामुळे हाताला काम नसल्याने उपासमारीची पाळी उदभवली होती याबाबत माहीती मिळताच कंकडालवार यांनी सदर गावातील पूर पिडीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या कीट्सचे वाटप करण्यात आले.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, माजी पंचायत समिती सभापती सौ.सुरेखा आलाम, सरपंचा सौ.लक्ष्मी मडावी, राजारामचे माजी सरपंच सौ.जोतीताई जुमानके, माजी उपसरपंच संजय पोरतेट, माजी उपसरपंच मोंडी लेंनगुरे, ग्राम पंचायत सदस्या सौ.सपना तलांडे, प्रिया पोरतेट, विलास बोरकर, दासु काम्बडे, माधव कूड़मेथे, दिपक अर्का, नारायण चालुरकर, जितेंद्र पंजलवार, नरेंद्र गरगम, प्रमोद गोडसेलवार, गुलाब देवगडे, लक्ष्मण जनगाम, सोहनलाल चापले, श्रीनिवास ठाकरे, कृष्ण लेंनगुरे, आदि उपस्थित होते.


