– कस्तुरबा गांधी विद्यालय, इंदाराम येथे गणवेश वाटप
The गडविश्व
अहेरी,२१ जुलै : तालुक्यातील इंदाराम येथील कस्तुरबा गांधी विद्यालय येथे विद्यार्थ्यांना जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले.
जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शाळा, महाविद्यालय सुरू झाले होते. मात्र जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे शाळां, महाविद्यालयात एक ते दीड आठवडा बंद होते. दरम्यान पूरपरिस्थिती आटोक्यात आल्यानंतर आज २१ जुलै पासून जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय सुरू झाले आहेत. आज अहेरी तालुक्यातील इंदाराम येथील कस्तुरबा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांना गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी सुद्धा उपस्थित होते. तहसीलदार ओंकार ओतारी यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले. गणवेश मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी विद्यालयातील शिक्षक वृंद, विद्यार्थी उपस्थित होते.