The गडविश्व
गडचिरोली : तालुक्यातील खुर्सा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आज शनिवार १६ एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले होते.
सदर मेळाव्याचे अध्यक्ष सरपंचा सौ. मंजुळाताई पदा ह्या होत्या तर उदघाट्न पोलीस पाटील प्रशांत रामटेक तर प्रमुख पाहुणे म्हणून शा. व्य. समितीच्या अध्यक्षा सौ. किरणताई क्षीरसागर , अविनाश सालोटकर, नितीन मंगर, तुराटेताई, पदा ताई, शा. व्य. समितीच्या सदस्या वंशिका लाडवे, सौ.आंबोरकर, सौ. जयश्री चिंचोलक, आशा वर्कर हिना मंगर, शाळेचे मुख्याध्यापक वासलवार, शिक्षक येनप्रेड्डीवार, जगदीश मडावी, उईके उपस्थित होते.
मेळाव्याप्रसंगी सर्व प्रथम शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती समवेत गावातून प्रभातफेरी काढून सर्वांचे लक्ष वेधून घेण्यात आले. भरतीपात्र विद्यार्थ्यांच्या गृहभेट देऊन त्यांचे व पालकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व मेळाव्यास येण्यास निमंत्रण देण्यात आले. सकाळी ८.३० वाजता मेळाव्याची सुरवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वासलवार यांनी सादर करून त्यात त्यांनी शाळांपूर्व तयारी मेळाव्याची माहिती दिली तर मडावी यांनी शाळांपूर्व तयारी मेळाव्यानंतर काय कार्यवाही आपल्या पाल्याला करायची आहे हे पालकांना समजावून सांगितले.
मेळाव्यामध्ये एकूण ७ स्टॉल लावण्यात आले होते. यामध्ये भरतीपात्र विद्यार्थांची नोंदणी, वजन व उंची घेण्यात आली. दुसऱ्या स्टॉल वर विद्या
र्थ्यांची शारीरिक तपासणी घेण्यात आले तर तिसऱ्या स्टॉल ला बौद्धिक विकासाचे परीक्षण करण्यात आले. चौतथ्या स्टॉल ला कौटुंबिक माहिती, भावनिक विकास, पाचव्या स्टॉल ला भाषा विकास, सहाव्या स्टॉल ला गणन पूर्व तयारी, आणि सातव्या समुपदेशन असे सात स्टॉल वरून विद्यार्थ्यांचे परीक्षण करण्यात आले.
यामध्ये शाळेतीन इयत्ता सहावी आणि सातवीतील विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून काम यशस्वीरित्या पार पाडले. सर्वांना खाऊ देऊन मेळाव्याची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मडावी यांनी केले तर आभार येणप्रेड्डीवार यांनी मानले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.