– धन्नूर येते व्हॉलीबाल स्पर्धेचे आयोजन
The गडविश्व
मूलचेरा : तालुक्यातील धन्नूर येथे पहांदी पारी कूपार लींगो क्रीडा मंडळ यांच्या वतीने आयोजित ग्रामीण व्हॉलीबाल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक माजी आमदार दिपक आत्राम यांचे कडून तर दुसरा पारितोषिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून तर तृतीय असे तीन पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे.
आज सदर स्पर्धेचे उदघाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोठारी ग्राम पंचायतचे सरपंचा कु.रोशनी कुसनाके होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, उपसरपंच सुरेश आत्राम, माजी सभापती नामदेव कुसनाके, पो.पा.सौ.भावना कुसनाके, माजी सरपंच मनिष मारकटकर, माजी सरपंच गुलाबराव सोयाम, मुख्याध्यापक एच.मूरमाडे सामाजिक कार्यकर्ते व्येंकटेश धानोरकर, दिनेश मडावी आदि मंचावर होते.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष रावजी कन्नाके, दिपक कुसनाके, रामदास सोयाम, साईनाथ मडावी, जोगदास कुसनाके व गावकरी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या संचालन व प्रस्ताविक कालीदास कुसनाके यांनी केले.