– राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेल्या जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा सत्कार
– विविध विकासकामांवर चर्चा
The गडविश्व
गडचिरोली : स्थानिक जिल्हा परिषदेच्या वीर बाबुराव शेडमाके सभागृहात स्थायी समितीची सभा जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत जिल्ह्यातील विविध विकासकामे व जिल्ह्यातील समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. तसेच यावेळी विविध प्रस्ताव सादर करण्यात आले. दरम्यान नुकताच जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबाबत त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
सभेला जि .प. उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरटी, कृषी सभापती प्रा. रमेश बारसागडे, समाज कल्याण सभापती रंजिताताई कोडापे, महिला व बालकल्याण सभापती रोशनी पारधी, उप-मुख्य कार्यकारी अधिकारी फारेंद्र कुत्तीरकर, जि .प. सदस्य रमाकांत ठेंगरी, अतुल गाण्यारपवार, रवींद्र शहा, सोनटक्के आदी उपस्थित होते.