– राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यास पुणे येथे रवाना
The गडविश्व
गडचिरोली : जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असोशियन महाराष्ट्र राज्य कडून दरवर्षी देण्यात येणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष राज्यस्तरीय पुरस्कार यावर्षी अतिदुर्गम व नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात केलेल्या विकासात्मक कामे, शासनाच्या विविध योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवणे, विविध शासकिय योजनेतून निधी आणून विकास कामे करणे, नेहमी आढावा बैठक घेऊन जिल्ह्यातील प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वयातून जिल्ह्याचा विकास कसा करता येईल याबद्दल चर्चा करून विकासाचे आराखडा तयार करून ग्रामीण भागाचे विकास करणे अश्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांना सदर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
राज्यस्तरीय पुरस्कार उद्या ७ मार्च २०२२२ रोजी पुणे येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात पार पडणार आहे. याकरिता गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांना पुरस्कार वितरण सोहळ्यास गडचिरोली येथून पुणे साठी रवाना झाले आहेत.
त्याचा सोबत त्यांची अर्धांगीनी सौ.सोनालीताई कंकडालवार, अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे, जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, जिल्हा परिषद सदस्या कु.सुनीता कुसनाके, माजी सरपंच गुलाबराव सोयाम, ऐकमेव कुंदावार, प्रकाश दुर्गे, किरण वेमूला, राकेश आल्लूरवार, राकेश सड़मेक, खरकाटे काका, प्रमोद गोडसेलवार प्रभाकर मडावी आदि आहेत.