जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

388

– मथुरानगर प्रिमियर लिंगच्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
The गडविश्व
मुलचेरा : तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या ग्रा.पं. मथुरानगर येथे मथुरानगर प्रिमियर लिगच्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आज सदर स्पर्धेचे उदघाटन जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जि. प. अध्यक्षांनी फलंदाजी करत फटकार मारला.
सदर क्रिडा स्पर्धेसाठी प्रथम व द्वितीय असे पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे.
उदघाटन दरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून वेलगुरचे उपसरपंच उमेश मोहूर्ले , मनोज अदिर रॉय, समीर अधिकारी, निरोद मंडल, सरोजित हलदर ग्रा.प.सदस्य, मिलन गोलदार, विनोदिनी मंडल सदस्य, मुख्याद्यापक टीकेदार, अधिरजी मल्लिक, मंडल, गाईन, नीलेश ओल्लालवार, विनोद मंडल, नारायण कुळमेते, जुगल मंडल, सचिन जोददार तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमच्या यशस्वितेसाटि मंडळाचे अध्यक्ष रंजन बिसु देवनाथ, उपाध्यक्ष बिशाल मंडल, कोषाध्यक्ष ब्रिजेन रॉय, सचिव सूजन रॉय, क्रीडा प्रमुख अजय राय यांचे विशेष सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here