जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते नवीन अंगणवाडी इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन

216

The गडविश्व
सिरोंचा : तालुक्यातील दरशेवाडा येथील अंगणवाडी इमारतीला अनेक काळ झाल्याने भविष्यात इमारत कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता होती. सदर बाब जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांना लक्षात आणून देऊन नवीन अंगणवाडी बांधकामाची मागणी करण्यात आली. जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार सदर मागणीची दखल घेऊन मुलांची गैरसोई दूर करण्यासाठी तात्काळ दरशेवाडा येथे नवीन अंगणवाडी इमारती मंजूर करण्यात. आज सदर नवीन अंगणवाडी इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी आदिवासी विद्यार्थी संघटनेचे सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम, अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडी, जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, ग्राम पंचायत सदस्य नामदेव कोडापे, संतोष जाकावार, हनमंतू तोडसाम, अभियंता मासे, प्रतिष्ठित नागरिक राजाराम कावरे, पोलीस पाटील वेंकटस्वामी कावरे, नरेश डुरके, श्रीनिवास मडपेल्ली, दिवाकर बेडकी, प्रशांत गोडशेलवार, आविस सोशल मीडिया प्रतिनिधी तिरुपती चिटयाला, साई मंदा राकेश सडमेक सह दरशेवाडा परिसरातील अनेक अविसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here