The गडविश्व
अहेरी : तालुक्यांतील महागाव (खुर्द) येथे माता मंदिर नसल्याने प्रत्येक वर्गातील समाजबांधवांना अडचण भासत होती. गांवात माता मंदिर होते मात्र लाकडा पासून तयार केलेले होते. प्रत्येक वैयक्तिक कार्यक्रम, सण उत्सव किंवा सामाजिक कार्यक्रमादसरम्यान सर्वप्रथम माता मंदिरात जावून पूजा अर्चना करूनच इतर कार्यक्रम पार पाडत असतात. मात्र माता मंदिर व्यवस्थित नसल्याने महागाव (खुर्द) येथील सर्व समाज बांधवांनी गांवात बैठक घेवून जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे माता मंदिर बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली. जिल्हा परिषद अध्यक्षांनी शासनाकडून माता मंदिर बांधकामासाठी निधी प्राप्त होत नाही. मात्र मी माझ्या स्वखर्चाने माता मंदिर बांधून देतो अशी ग्वाही दिली व सदर मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. आज जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते पूजा अर्चाना करून रितसर उदघाटन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महागावचे सरपंचा सौ.रेणुका आत्राम होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्या कु.सुनीता कुसनाके, श्रीनिवास आलाम, ग्रा.पं.सदस्य मधुकर आत्राम, गणेश चौधरी, श्रीहरी आलाम, उमा मडगुलवार, मानिषा चौधरी, जीजा कूसरम, सौ.चंद्रकला कोडापे पो.पा.ग्रा.प.सदस्य राजू दुर्गे, वंदना दुर्गे, संगीता आत्राम, चंद्राजी रामटेके, प्रमोद रामटेके, दिपक कुसनाके, बबलू, इस्ठाम, शंकुतला आलाम, पेन्टुबाई नैताम, लक्ष्मी आलाम, बारीकराव तलांडे, नागलू आत्राम, सखाराम आलाम, तुकाराम नैताम, प्रभाकर मडगुलवार, बाजीराव आत्राम, संतोष मरपेलीवार आदि उपस्थित होते.