जिल्ह्यातील शाळा 50 टक्के उपस्थितीने सुरू करा

268

-आम आदमी पार्टीची जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांना निवेदनातून मागणी

The गडविश्व
गडचीरोली : जिल्ह्यातील शाळा ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यात याव्या अशी मागणी
आम आदमी पार्टी गडचिरोलीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यातिल मोठ्या शहरात कोरोनाचा उद्रेक असतांनाही ग्रामीण भागात वाढता प्रादुर्भाव दिसून आला नाही तरी शासनाने सरसकट बंद केलेल्या शाळा, महाविद्यालये ५० टक्के क्षमतेने सूरू करण्यात यावे. ऑनलाईन शिक्षण नेटवर्क अभावी ग्रामीण भागात कुचकामी ठरत आहे त्यामुळे आनलाईन शिक्षणाचा पर्याय बंद करुन शहरी भागातील विद्यार्थ्यांबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करावा. इंग्रजी शाळा पालकांची करत असलेली दिशाभुल थांबवावी, गेली दिड वर्षा पासून विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान थांबवावे व अशैक्षणिक निर्णय मागे घेऊन शाळा, महाविद्यालये सुरू करण्यात यावे आदी मागण्या निवेदनातून करण्यात आले आहे.
निवेदन देतांना आम आदमी पार्टी गडचिरोलीचे जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे, सचिव संजय वाळके, कोषाध्यक्ष संजय जिवतोडे, महामंत्री भास्कर इंगळे, शहर मीडिया प्रमुख नामदेव पोले, डॉ.सुरेश गेडाम, कैलास शर्मा, अनिल बाळेकरमकर, संघटनमंत्री डॉ.देवेंद्र मुनघाटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here