The गडविश्व
चामोर्शी, १८ ऑगस्ट : शिवकल्याण युथ मल्टिपरपज डेव्हलपमेंट असोसिएशन संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त युवा सामजिक कार्यकर्ते अनुप कोहळे यांनी चामोर्शी तालुक्यातील आमगाव (म.) येथील शहीद बाबूराव शेडमाके माध्यमिक विद्यालय आणि जि.प. उच्च प्राथ. केंद्र शाळेला सदिच्छा भेट दिली व विद्यार्थ्यांशी विविध विषयांवर हितगुज करून विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाच्या संदर्भाने मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना नोटबुक चे वितरण केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना अनुप कोहळे म्हणाले येणारा काळ हा स्पर्धेचा आहे. त्यामुळे अभ्यासासोबतच क्रीडा, वत्कृत्व, लिखाण सारख्या विविध कला प्रत्येक विद्यार्त्यांनी आत्मसात करून स्वतःचा व्यक्तिमत्व तयार करावा तेव्हाच आपण या स्पर्धेच्या युगात स्वतःचा अस्तित्व निर्माण करू शकणार.
याप्रसंगी श.बा. शेडमाके माध्य.विद्यालयाचे प्राचार्य अनिल गांगरेड्डीवार, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक अहिलावार, सुनील वांढरे, पुरुषोत्तम गुरुनुले, सुवेंदु मंडल, नरेंद्र चिटमलवार, अनिल निमजे, किशोर पोहनकर, चंदू सातपुते, सुरेश केळझरकर, रुचिता बंडावार, कविता पुण्यपकर, निशा रामगुंडे, श्रुती मोतकुरवार तसेच लीलाधर दुधबळे, तिरुपती बहिरवार, रतन सिकदर, सुरज मुनगेलवार, युवा सामजिक कार्यकर्ते राजू सोमनकर, आशिष भांडेकर आधी उपस्थित होते .