The गडविश्व
गडचिरोली, २ ऑक्टोबर : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खुर्सा येथे भारतीय लोकशाही ची प्रत्येक्ष मतदान प्रक्रियाचे अनुभूती देत शालेय मंत्रीमंडळची नियुक्ती ३० सप्टेंबर २०२२ करण्यात आले.
यामध्ये शालेय मुख्यमंत्री या पदा करिता सर्व विध्यार्थ्यामध्ये बहुमत सिद्ध करत कु.कशिश मनोहर डोंगरे विराजमान झाली. तर उपमुख्यमंत्री मोहित संदीप भोयर, शालेय शिक्षणमंत्री कु. नताशा सुरेश मेश्राम, समीर संजय गांधेलवार, स्वच्छतामंत्री कालक्षय शेषराव पदा, कु. सानिया कवडू डोईजड, शालेय परिपाठमंत्री पार्थ संतोष आंबोरकर, सांस्कृतिकमंत्री कु. अश्विना रामण लाडवे, कु. समीक्षा चंद्रशेखर सालोटकर, क्रिडामंत्री तुषार उमाकांत खेवले, कन्हैया मारोती मेश्राम, शालेय पोषण आहार मंत्री सुमित माणिक मेश्राम, साईनाथ शांताराम लाडवे, वृक्षसंवर्धनमंत्री कांचन दशरथ तिम्मा, ओम मेश्राम, सहशालेय उपक्रम मंत्री कु.लीनाताई नितीन येलमुले, कु. संघवी शामराव भोपये आणि चांद कठाणे.
मतदान निर्णय अधिकारी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक सुरेश वासलवार होते तर मतदान अधिकारी म्हणून अविनाश येनप्रेडडीवार, हलामी, किशोर उईके, जगदीश मडावी यांनी प्रमुख भूमिका पार पाडली. सर्व तांत्रिक बाबी जगदीश मडावी यांनी अगदी योग्य रित्या सांभाळले.
निवडून आलेल्या सर्वशालेय मंत्रीमंडळ चे पुष्पगुच्छ देऊन शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी स्वागत व अभिनंदन केल तर सर्व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेश मंगर व पदाधिकारी यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या. मतदान प्रक्रिया सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी रोहित मेश्राम व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.