जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ऑनलाइन समुपदेशन सत्राचे आयोजन

128

The गडविश्व
चंद्रपूर : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर या कार्यालयाच्यावतीने जागतिक महिला निमित्त 8 मार्च 2022 रोजी दुपारी 3 ते 4 वाजताच्या कालावधीत ऑनलाईन समुपदेशनाचे सत्र आयोजित करण्यात आले आहे.
या मार्गदर्शन सत्रामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार प्रिती डुडूलकर, तहसीलदार डॉ.कांचन जगताप प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या ऑनलाईन मार्गदर्शनाचा लाभ घेण्याकरिता meet.google.com/igf-puus-grq या लिंकचा वापर करावा अथवा चंद्रपूर रोजगार या फेसबुक प्रोफाइलला भेट देऊन सदर लिंकचा वापर करावा. जिल्ह्यातील अधिकाधिक उमेदवारांनी ऑनलाइन समूपदेशन सत्राचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे, सहायक आयुक्त, भैयाजी येरमे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here