जहाल नक्षली हुलस यादव ला अटक

1237

– १५ लाख रुपयांचे बक्षीस होते जाहीर, अनेक घातपातांच्या कारवायांमध्ये होता सहभाग
The गडविश्व
मुंबई, १८ सप्टेंबर : १५ लाख रुपयांचे बक्षीस, मुळचा झारखंड येथील रहिवासी असलेल्या जहाल नक्षली हुलस यादव (४५) याला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) मुंबई उपनगरातील नालासोपाऱ्यातून अटक केली आहे. या घटनेने नालासोपारा परीसरात एकच खळबळ उडाली आहे.
जहाल नक्षली हुलस यादव चा अनेक घातपातांच्या कारवायांमध्ये सहभाग होता. तो झारखंडमधून मुंबईत उपचारासाठी आला होता. नालासोपारा परीसरात तो लपून राहत होता. याची गुप्त माहिती माहिती एटीएसला (ATS) मिळाली. मिळलेल्या माहितीच्या आधारे एटीएसने आज सकाळच्या सुमारास नालासोपाराच्या धानीव बाग आणि रामनगर भागातील चाळींवर छापे टाकले. या छाप्यात त्यांनी हुलस यादव या जहाल नक्षलीस अटक केली. या घटनेने मात्र नालासोपारा परीसरात एकच खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here