– गडचिरोली जि.प. चे मुख्यकार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांचीही ई-परिषदेत उपस्थिती
The गडविश्व मुंबई : जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल आणि स्वच्छता विभागातर्फे आज आकांक्षी जिल्ह्यांमध्ये खात्रीशीर पेयजल पुरवठा आणि ओडीएफ प्लस संबंधी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी आपल्या भाषणात सांगितले की,“आकांक्षी जिल्हे अनेक प्रकारे आगळे आहेत आणि त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. या प्रदेशातल्या कामा संबंधी मॉडेलची संयुक्त राष्ट्रांसह अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी प्रशंसा केली आहे. पाणी आणि स्वच्छतेचा प्रभाव विविधांगी असून त्याचा थेट परिणाम आरोग्य आणि पोषणावर होतो. त्यामुळे जिल्हाधिकार्यांनी आणि धोरणकर्त्यांनी शौचालयाची सुविधा आणि नळाद्वारे पाणी प्रत्येक ग्रामीण घरापर्यंत दिलेल्या मुदतीत पोहोचेल हे सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक पुढाकार पूरवणे महत्त्वाचे आहे.” पेयजल आणि स्वच्छता विभागाच्या सचिव विनी महाजन, मुख्य सचिव, पेयजल आणि स्वच्छता विभागाचे अतिरिक्त सचिव, अरुण बरोका, राज्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि प्रधान सचिव, केंद्रीय मंत्रालये नीती आयोग, राज्य सरकारांचे एक हजाराहून अधिक अधिकारी आणि आकांक्षी जिल्ह्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी/जिल्हाधिकारी या ई-परिषदेत सहभागी झाले होते.
कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, गडचिरोली, महाराष्ट्र, आर के शर्मा, जिल्हाधिकारी, नमसाई, अरुणाचल प्रदेश, उदय प्रवीण, जिल्हाधिकारी, उदलगुरी, आसाम आणि दीपक सोनी, जिल्हाधिकारी, दंतेवाडा छत्तीसगड यांनी त्यांच्या जिल्ह्यांमध्ये नळाद्वारे स्वच्छ पाणी आणि स्वच्छता सुविधा प्रदान करण्याच्या आव्हानांवर नावीन्यपूर्णे संशोधनाद्वारे मात करण्याचा त्यांचा अनुभव सामायिक केला.