जय गोंडवाना क्लब मेडपल्लीच्या वतीने भव्य व्हॉलिबाल स्पर्धेचा शुभारंभ

426

– माजी आमदार दीपक दादा आत्राम व जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन संप्पन

The गडविश्व
अहेरी : तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या मेडपल्ली येथे जय गोंडवाना क्लब मेडपल्लीच्या वतीने भव्य व्हॉलिबाल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आज सदर स्पर्धेचे उदघाटन माजी आमदार दीपक दादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार होते.
सदर क्रिडा स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय व तृतीय असे तीन पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रा.प.मेडपल्लीचे सरपंच नीलेश वेलादी, सुरेश जाकेवार, चादेकर, सीताराम मडावी, रमेश जाकेवर, माजी सरपंच तुकाराम वेलादी, नामदेव तोर्रेम, महेश वेलादी, राकेश जाकेवार, माजी पोलिस पाटिल बिचन्गा वेलादी, तिरुपति पेंदाम, जोगा तलांडे तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here