चारचाकी वाहनासह ६ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त

299

– आरोपीस अटक
The गडविश्व
गडचिरोली : चामोर्शी पोलीसांनी कर्कापल्ली फाटा ते राजनगट्टा रस्त्यावर सापळा कारवाई करून चारचाकी वाहनासह ६ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी प्रकाश विजय बर्वेकर (२९) रा.दुर्गापूर जि.चंद्रपूर यास अटक करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, चामोर्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बिपीन शेवाळे यांना दारूची वाहतुक होणार असल्याची गोपनिय माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने मंगळवारी रात्रो १० वाजताच्या सुमारास कर्कापल्ली फाटा ते राजनगट्टा मार्गावर सापळा रचला. दरम्यान प्रकाश बर्वेकर हा चिल्लर दारू विक्रेत्यांना देशी दारूचा पुरवठा करण्यासाठी एमएच १५ बीडी १८६४ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने दारूची वाहतूक करत होता. यावेळी वाहनाला थांबवून वाहनाची झडती घेतली असता वाहनात १ लाख ५० हजारांची देशी दारू आढळून आली. याप्रकरणी पोलीसांनी दारू व वाहन ताब्यात घेत दारूसह चारचाकी वाहन किंमत ५ लाख रूपये असा एकुण ६ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. व यातील आरोपी प्रकाश बर्वेकर याविरूध्द दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथकातील सहायक फौजदार शालिकराम गिरडकर, पोहवा देवेंद्र मजोके, पोन ज्ञानेश्वर लाकडे, पोना विनोद कुनघाडकर, पोशि संदीप भिवणकर यांनी केली. पुढील तपास सफौ शालिकराम गिरडकर करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here