– पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात नगरपंचायतींवर काँग्रेसचे वर्चस्व
The गडविश्व
चंद्रपूर : जिल्ह्यातील सिंदेवाही, सावली, पोंभुर्णा, गाेंडपिपरी, कोरपना व जिवती या सहा नगरपंचायतीच्या एकूण १०२ जागांसाठी निवडणूक पार पडल्या. आज सदर निवडणुकांचे निकाल लागले असून जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींपैकी पाच नगरपंचायतींवर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित केले आहे तर भाजपला पोंभुर्णा या एकाच नगरपंचायतीवर विजय मिळवित समाधान मानवे लागले आहे..
या निवडणुकीमध्ये काँग्रेसला सर्वाधिक ५३ जागा मिळाला तर भाजपला २४ जागांवरच थांबावे लागले. राष्ट्रवादी कॉग्रेसला ८, शिवसेना ४, अपक्ष ३ आणि गोंडवाना गणतंत्र पार्टीला ५ जागा व शेतकरी संघटना तसेेच बहुजन वंचित आघाडीला प्रत्येकी १ जागा मिळाली आहे.
सिंदेवाही : काँग्रेस -१३, भाजप ३, अपक्ष १
सावली : काँग्रेस -१४, भाजप -३
पोंभुर्णा : भाजप -१०, शिवसेना ४, वंचित २, काँग्रेस १
गोंडपिपरी : काँग्रेस ७, भाजप ४ शिवसेना २, राष्ट्रवादी काँग्रेस २, अपक्ष २
कोरपना : काँगेस १२, भाजप ४, शेतकरी संघटना १
जिवती : काँग्रेस ६, राष्ट्रवादी काँग्रेस ६, गोंगपा ५