The गडविश्व
गडचिरोली, २९ ऑगस्ट : मुक्तिपथ अभियानाच्यावतीने विविध गावात आयोजित गाव पातळी शिबिराच्या माध्यमातून एकूण ४९ रुग्णांवर उपचार करण्यात आला. सोबतच रुग्णांचे समुपदेशन करीत औषधोपचार करण्यात आला.
आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा येथील शिबिरात २३ रूग्णांनी नोंदणी करून पूर्ण उपचार घेतला. प्राजू गायकवाड यांनी रुग्णांचे समुपदेशन केले तर केस हिस्ट्री प्रभाकर केळझरकर यांनी घेतली. रुग्णांची नोंदणी सुष्मा वासनिक यांनी केली. या उपक्रमाचे नियोजन मुक्तिपथचे अनूप नंदगिरवार यांनी केले. यावेळी सरपंच संदीप ठाकूर व ग्रामसेवक कलांगा उपस्थित होते. कोरची तालुक्यातील सोहले खडका येथे आयोजित शिबिराचा एकूण १० रुग्णांनी लाभ घेतला. यावेळी मुक्तिपथचे उपसंचालक संतोष सावळकर यांनी रुग्णांचे समुपदेशन केले. तसेच पिपीटीच्या माध्यमातून दारूच्या व्यसनासंदर्भात मार्गदर्शन केले. या शिबिराचे नियोजन तालुका संघटिका निळा किन्नाके यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी महेश लाडे, शेख, शालीनी लाडे, ताराबाई काटेंगे, शशिकला काटेंगे शुभम बारसे, राकेश ढवडे यांनी सहकार्य केले. देसाईगंज तालुक्यातील एकलपूर येथील शिबिराला एकूण १६ रुग्णांनी भेट दिली. अशा विविध ठिकाणी आयोजित शिबिराच्या माध्यमातून एकूण ४९ रुग्णांवर उपचार करण्यात आला.
