ग्रामीण भागातील २८ रुग्णांवर उपचार

214

The गडविश्व
गडचिरोली : मुलचेरा तालुक्यातील आंबटपल्ली व कोडीगाव येथे गावकऱ्यांच्या मागणीनुसार व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही शिबिराच्या माध्यमातून एकूण २८ रुग्णांनी उपचार घेत दारूच्या व्यसनातून मुक्त होण्याचा निर्धार केला आहे.
आंबटपल्ली येथील शिबिरात १५ रुग्णांनी पूर्ण उपचार घेतला. शिबिराच्या यशस्वीतेसाठी पोलिस पाटील मुक्तेश्वर मडावी, संघटना सचिव हरीचंद्र मराठे, प्रतिष्ठित नागरिक गुरुदास मडावी, गुरुदास मडावी, रोहित मडावी यांनी सहकार्य केले. कोडीगाव येथील क्लिनिकमध्ये १३ रुग्णांनी पूर्ण उपचार घेतला. यावेळी ग्राम कोष समितीचे सदस्य तुकाराम मडावी, मधुकर निकेसर, मुक्तिपथ संघटना उपाध्यक्ष किशोर मोहुर्ले, प्रतिष्ठित नागरिक बंडू मोहूर्ले, सुभाष गंगुवार उपस्थित होते. शिबिरादरम्यान अरुण भोसले यांनी रुग्णांना समुपदेशन केले. रुग्णांना दारूची सवय कशी लागते, आरोग्यावर कोणते परिणाम होते. धोक्याचे घटक आदींची माहिती दिली. संयोजक छत्रपती घवघवे यांनी रुग्णांची केस हिष्ट्री घेतली. दोन्ही शिबिराचे नियोजन तालुका संघटक रुपेश अंबादे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here