– ग्रा.पं. सदस्य तथा सामाजीक कार्यकर्ता राकेश गोलेपल्लीवार यांची मागणी
The गडविश्व
सावली : तालुक्यातील रेती घाट बंद असल्यामुळे ग्रामीण भागात पंतप्रधान आवास योजनेतील घरकुल धारकाना मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेता शासनाने ग्रामीण भागातील घरकुल धारकांना रेती उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी ग्रा.पं. सदस्य तथा सामाजीक कार्यकर्ता राकेश गोलेपल्लीवार यांनी केली आहे.
ग्रामीण भागातील गरीब जनतेचे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अनेक दिवसापासुन बाधकाम सुरु आहेत .तर काही लाभार्थ्यांच्या घराचे अजूनही कामाला सुरूवात झालेली नाही. अशातच रेती उपल्बध होत नसल्यामुळे अनेक घरकुल धारकाना रेती अभावी घर बाधकाम अर्धावस्थेत दिसुन येत आहे.
रेती अभावी घरकुल बाधकामात अळथळा निर्माण झाल्याने अनेक घरकुल धारकाना मोठा त्रास होत आहे. सिमेंट, लोहा, विटा, गिट्टी यांचा भाव वाढल्याने सामान्यांना योजनेच्या पैशातून घर बांधणे कठीण होऊन गेले आहे. घर बांधायचे असेल तर इकडून-तिकडून पैशाची जुळवा जुळव करावी लागते. अशातच रेती मिळणे ही अशक्य झाले असुन आणि पुढील पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे घरकुल धारकांना रेती मिळत नसल्याने अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. अनेक घरकुल धारकाना पावसाअभावी नाहक त्रास सहन लागणार असल्याने त्यांची घराचे अर्धे बांधकाम करून तर काहींना घर बांधकामाला सुरुवात करता येणार नाही. नदीला पूर आल्यानंतर त्यांना रेती मिळणेही कठीण होऊन जाणार आहे. अशातच लाभार्थ्यांना योजनेपासून मुकावे लागणार आहे त्यामुळे नदीला पुर येण्याअगोदर लाभार्थ्यांना तहसील कार्यालय मार्फत झिरो रॉयल्टी पास देऊन घरकुल धारकांना पाच ब्रास रेती उपल्बध करुन द्यावी अशी मागणी ग्रा.पं. सदस्य राकेश गोलेपल्लीवार यांनी केली आहे.