– भागवत सप्ताहानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन
The गडविश्व
चामोर्शी : तालुक्यातील लक्ष्मणपुर येथे १० एप्रिल पासून भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने गावांमध्ये विविध उपक्रम राबवले जात आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांच्या विचारांना आदर्श मानून ग्रामस्वच्छता मोहीम राबविली जात आहे. या उपक्रमांपैकी एक उत्कृष्ट ठरावा असा उपक्रम म्हणजे लक्ष्मणपुर मधील गावातील महिलांनी स्वतः रस्त्यावरती येऊन गावातील सगळे रस्ते स्वच्छ करीत आहे. आणि “सुंदर स्वच्छ रस्ता गावचा गुदस्ता” याचे उपयोजन केले जात आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून गावांमध्ये अशा प्रकारचा एकही कार्यक्रम झालेला नव्हता. तेव्हा गावातील ग्रामवासीयांनी सगळ्यांच्या आर्थिक व श्रमदानातून आणि युवकांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविल्या जात आहे. येथील गुरुदेव सेवा मंडळ व ग्रामजनता यांच्या सहकार्याने गावातल्या छोट्या-मोठ्या सगळ्या संघटनांनी एकत्र येऊन आपले गाव आपणच ग्रामविकासाच्या वाटेवरती नेण्यासाठी उपक्रम राबवले जात आहे. परिसरामध्ये असा उपक्रम राबवणारे लक्ष्मणपुर हे गाव एक आदर्श गावाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याची चर्चा सभोवार होताना दिसते. प्रबोधनाचे कार्यक्रम घेऊन, सामाजिक बांधिलकी चे मूल्य रुजवून सामाजिक कार्यात येथील प्रत्येक नागरिक सहभागी होत आहे.