ग्रामपंचायत समितीने घेतला दारूविक्री बंदीचा ठराव 

236

 The गडविश्व
गडचिरोली,१९ सप्टेंबर : चामोर्शी तालुक्यातील कुथेगाव येथे ग्रापं समिती पुनर्गठित करण्याच्या उद्देशाने सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील अवैध दारूविक्री बंद करण्याचा सर्वानुमते ठराव घेण्यात आला.

याप्रसंगी मुक्तीपथ ग्रामपंचायत समितीबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांचे वाचन करण्यात आले व समितीचे पुनर्गठन करण्यात आले. समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सहसचिव यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. याप्रसंगी कलम १८८, २७२, २७३, ग्रामपंचायत अधिनियम दारू बंदी कायदा, पेसा कायदा, अल्पवयीन मुलांचा संरक्षण कायदा, साथरोग कायदा, सुगंधित तंबाखू गुटखा बंदी कायदा, अन्न व औषध मानके कायदा इत्यादी कायद्याची अंमलबजावणी करून आपले गाव दारू व तंबाखूमुक्त करण्यासाठी काय करता येईल व व्यसनापासून कसे दूर राहता येईल, याबाबत मुक्तिपथ तालुका उपसंघटक आनंद सिडाम यांनी समजावून सांगितले. दरम्यान, समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गावातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी दारूविक्रेत्यांना नोटीस बजावणे व त्यांनंतरही अवैध व्यवसाय सुरूच ठेवणाऱ्यांकडून 5 हजाराचा दंड वसूल करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.

यावेळी सरपंच हरिदास कळ्यामी, उपसरपंच विनोद भांडेकर, सचिव एस.वाय. लट्ठे, मुख्याध्यापक जे.जी.गेडाम, सुनीता भांडेकर, अंगणवाडी सेविका शामलता गोवर्धन, माजी सरपंच सुनीता पोटावी, आशा वर्कर भूमिका माधमवार, रुपेश बुरे, दशरथ हेडो, देवशा मडावी, शामराव उसेंडी, सोनी सहारे यांच्यासह युवक व नागरिक उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here