– गोंडवाना गोटुल सेना जिल्हा सचिव परमेश्वर शेषराव गावडे यांची निवेदनातून मागणी
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, २४ सप्टेंबर : तालुक्यातिल पेंढरी- गट्टा परिसरा अंतर्गत येत असलेल्या सर्व ग्रामपंचायत मधील सचिव हे एका आठवड्यातून मंगळवार किंवा गुरुवारलाच फक्त आपली ड्युटी बजावीत असतात बाकीचे दिवस पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेत मिटिंग असल्याचे कारण सांगून ग्रामपंचायतीला अनुपस्थित राहतात. त्यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सचिवांना स्थानिक ठिकाणी राहूनच ड्युटी करण्याची ताकीद द्या अशी मागणी गोंडवाना गोटुल सेना जिल्हा सचिव परमेश्वर शेषराव गावडे यांनी संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती धानोरा यांना केली आहे.
तालुक्यातील नागरिकाने विविध दाखल्याकरिता ग्रामपंचायत सचिवांकडे जावे लागते. मात्र ग्रामपंचायत सचिव स्थानिक आठवड्यातून दोनच दिवस राहत असल्याने याचा नाहक त्यास नागरिकाने सहन करावा लागत आहे. शासनाच्या योजनाचा लाभ घेण्यासाठी वेळच्यावेळीच मिळत नसल्याने लाभार्थी योजने पासुन वंचित राहतात. त्यांना कोणत्याही प्रकारचे दाखले पाहिजे असल्यास सदर कर्मचारी नेहमीच गैरहजर असतात. त्यामुळे नागरिकांची कामे अडून पडलेली आहेत. तसेच ग्राम पातळीवरील विकास कामाची गती मंदावलेली आहे. या सर्व गोष्टीकडे त्यांचे अधिनस्त वरिष्ठ अधिकारी सुद्धा दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी निवेदनातुन केलेला आहे. तरी उपरोक्त सर्व ग्रामपंचायत परिसरातील सचिवांना स्थानिक पातळीवर वास्तव्यास राहून पुर्ण वेळ ड्युटी करण्याचे आदेश आपणाकडून निर्गमित करण्यात यावे जेणेकरून येथील परिसरातील नागरिकांची कामे होण्यास अडचण निर्माण होणार नाही व ग्राम पातळीवरील विकास कामांना गती मिळेल अशी मागणी गोंडवाना गोटुल सेना जिल्हा सचिव परमेश्वर शेषराव गावडे यांनी संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती धानोरा यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
