– ३ लाख ८० हजरांचा मुद्देमाल जप्त, ८ गोवंशांना जीवनदान
The गडविश्व
सावली, १९ ऑक्टोबर : गोवंशांची अवैधरित्या वाहतूक होत असलेल्या माहितीच्या आधारे नाकाबंदी करून गोवंश तस्करांच्या मुसक्या आवळत ८ गोवंशांना जीवनदान देत चारचाकी वाहनासह ३ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई १७ ऑक्टोबर ला सकाळच्या सुमारास करण्यात आली.
याप्रकरणी अरुण बाबुराव निकोडे (५०), संगम विनोद कोल्हटकर (१९) दोन्ही रा.टेकाडी ता.मुल जि. चंद्रपूर यांना अटक करण्यात आली आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे सावली पोलिसांनी १७ ऑक्टोबर ला सकाळच्या सुमारास खेडी फाटा येथे नाकाबंदी केली असता एमएच ३४ एबी ७६५३ क्रमांकाचे महिंद्रा पीक अप वाहन ०८ गोवंश जनावरे अवैधरित्या वाहतूक करतांना मिळून आले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध 228/22 महा.पशू संरक्षण अधि.कलम 5a,5b, प्राणी छळ प्रति.अधि.कलम 11(1) D,F , महा.पोलीस अधि. कलम 119,मो.वा.का कलम 83/177 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला व वाहन किंमत ३ लाख व जनावरे किंमत ८० हजार असा एकूण ०३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक अरविंद साळवे , सावलीचे ठाणेदार आशिष बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल दर्शन लाटकर, विशाल दुर्योधन, धीरज पिदुरकर यांनी केली.