गोंडवाना विद्यापीठात दिक्षारंभ कार्यक्रम संपन्न

115

The गडविश्व
गडचिरोली,ल (Gadchiroli) २८ सप्टेंबर : गोंडवाना विद्यापीठातील पदव्युत्तर शैक्षणिक वाणिज्य विभागातर्फे शैक्षणिक वर्षातील पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाच्या च्या प्रवेशीत विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय दीक्षारंभ २०२२ ( इंडक्शन प्रोग्राम) चे आयोजन गोंडवाना विद्यापीठात करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे, प्रमुख वक्ते म्हणून महारोगी सेवा समितीचे अध्यक्ष सोमनाथ, डॉ. कौस्तुभ आमटे , प्राचार्य एस.बी.सीटी कॉलेज नागपूर, डॉ. सुजित मित्रे , प्रमुख अतिथी म्हणून पल्लवी आमटे आणि वाणिज्य विभागाच्या विभाग प्रमुख डॉ.अंरूधती निनावे आदींची उपस्थिती होती.

‘जीवनदृष्टी’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना महारोगी सेवा समितीचे अध्यक्ष कौस्तुभ आमटे म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपले लक्ष नेहमी आपल्या ध्येयावर ठेवायला हवे आहे. सोशल मीडियाचा अतोनात वापर करून आपण आपला वेळ घालवतो त्यामुळे वेळचा अपव्यय होतो. विद्यार्थ्यांनी वाचण्याची सवय वाढवायला हवी आहे. त्याचा उपयोग निश्चित ध्येय गाठण्यासाठी होतो.

अध्यक्ष स्थानावरून बोलताना गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले, दिक्षारंभ म्हणजे दीक्षेचा आरंभ. दिक्षेमध्ये समर्पणाचा भाव असतो. आपल्या जीवनाचे शिल्पकार हे आपणच असतो त्यामुळे मी पुढे काय करणार आहे हे निश्चित असायला हवे. सध्या आयुष्याचा तुमच्याकडे जो काळ आहे तो आयुष्याचा सुवर्ण काळ आहे आणि या वयात सगळ्यात जास्त ऊर्जा असते. विद्यापीठाला अभिमान वाटेल असे जगणे असायला हवे आहे. आणि हेच जगणे सुसहाय्य करण्यासाठी दिक्षारंभ हा कार्यक्रम आहे असे ते म्हणाले.

एस.बी.सीटी कॉलेज नागपूर चे प्राचार्य डॉ. सुजित मित्रे व्यक्तीमत्व विकास या विषयावर बोलतांना म्हणाले, दैनंदिन जीवनात व्यक्तीमत्व विकासाला महत्व असल्यामुळे विद्यार्थ्यांनी त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
अनेक उदाहरणे देत याचे महत्व त्यांनी विशद केले.

दीक्षारंभ चा उद्देश नवीन विद्यार्थ्यांना नवीन वातावरणात जुळवून घेण्यास आणि आरामदायक वाटण्यास मदत करणे, त्यांच्यामध्ये विद्यापीठाविषयी नैतिकता आणि संस्कृती रुजवणे, त्यांना इतर विद्यार्थी आणि प्राध्यापक सदस्यांसोबत बंध निर्माण करण्यास मदत करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.डॉ. अरूंधती निनावे, संचालन प्रा. डॉ. प्रिया गेडाम यांनी तर आभार प्रा. डॉ. देवदत्त तारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ.उत्तमचंद कांबळे, प्रा. डॉ. प्रशांत सोनवणे आणि प्रा. डॉ. अनिरुद्ध गचके यांनी परीश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here