गोंडवाना विद्यापीठात ऑनलाईन रिसिप्ट काउंटर सुविधा सुरू

1023

The गडविश्व
गडचिरोली, १६ ऑक्टोबर : गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये, प्रवेशित सर्व विद्यार्थी तसेच विद्यापीठाशी संबंधित सर्वांना विविध प्रकारच्या रकमांचा भरणा त्यांचे सोईचे वेळेनुसार व कुठल्याही ठिकाणाहून ऑनलाईन पध्दतीने करता येण्यासाठी तसेच सदर भरणा केलेल्या रकमेची पावती त्याच वेळी त्यांना ऑनलाईन पध्दतीने मिळण्यासाठी गोंडवाना विद्यापीठाकडून ऑनलाईन रिसिप्ट काउंटर सुविधा सुरु करण्यात येत आहे.

ऑनलाईन रिसिप्ट काउंटर (ORC) सुविधेचा लाभ घेण्यासाठी संबंधितांनी गोंडवाना विद्यापीठाच्या www.unigug.ac.in या वेबसाईटला भेट द्यावी. वेबसाईटवरील मुख्य पृष्ठावर (home page वर) ऑनलाइन रिसिप्ट काउंटर या नावाने उपलब्ध असलेल्या लिक (link) वर क्लिक केल्यावर ऑनलाईन रिसिप्ट काउंटरचे पृष्ट (page) उपलब्ध होईल. त्यावर वेगवेगळया रक्कम हस्तांतरण माध्यमांतून (उदा. UPI, Phone Banking ई.) रकमेचा भरणा संबंधितांना करता येईल. सदर ऑनलाईन भरणा केलेल्या रकमेची सिस्टम जनरेटेड ई-पावती तात्काळ संबंधितांच्या ईमेलवर ऑनलाइन रिसिप्ट काउंटर द्वारे उपलब्ध करुन देण्यात येईल. अधिक मार्गदर्शनासाठी ऑनलाईन रिसिप्ट काऊंटरच्या पृष्ठावर वापरकर्त्यांसाठी माहितीपुस्तिका (user mannual) पिडीएफ स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. दरम्यान वापरकत्यांना काही मदत लागल्यास ऑनलाईन रिसिप्ट काऊंटरच्या पृष्ठावर Contact for Help या नावाने सबलिंक (sublink) उपलब्ध करून देण्यात येत आहे.

ऑनलाईन रिसिप्ट काउंटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्यामुळे NEFT/RTGS द्वारे शुल्क रकमांचा भरणा करण्यासंबंधीचे यापूर्वीचे परिपत्रक १५४०, ०२ सप्टेंबर २०२२ यान्वये रद्द करण्यात येत आहे. तरी गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये, प्रवेशित सर्व विद्यार्थी तसेच विद्यापीठाशी संबंधित सर्वानी ऑनलाइन रिसिप्ट काउंटर या सुविधेचा लाभ घ्यावा असे साकेत दशपुत्र, वित्त व लेखा अधिकारी
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here