गांगोली येथे शिबिराचे आयोजन : १२ रुग्णांवर पूर्ण उपचार

112

The गडविश्व
कुरखेडा : तालुक्यातील गांगोली येथे गावकऱ्यांच्या मागणीनुसार मुक्तीपथ अभियानातर्फे एक दिवशीय व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून एकूण 12 रुग्णांवर पूर्ण उपचार करण्यात आला.
गावातील व्यसनी रुग्णांनी उत्तम प्रतिसाद देत शिबिरात सहभाग घेतला. एकूण 12 रुग्णांवर पूर्ण उपचार व औषोधोपचार करण्यात आला. दारूचे व्यसन हा एक मानसिक आजार आहे आणि तो उपचाराने बरा होतो. दारूची सवय सोडण्यासाठी तसेच यातून उद्भवणारा त्रास कमी करण्यासाठी उपचार घेणे आवश्यक आहे. दारूची सवय कशी लागते, शरीरावर कोणते दुष्परिणाम दिसतात, धोक्याचे घटक, नियमित औषोधोपचार घेणे आदींची माहिती देत प्राजु गायकवाड यांनी रुग्णांना समुपदेशन केले. यावेळी शिबीर संयोजक प्रभाकर केळझरकर यांनी रुग्णांची केस हिष्ट्री घेतली. तसेच दारू पिण्याचे दुष्परिणाम समजावून सांगितले.
क्लिनिकचे नियोजन मुक्तीपथ तालुका प्रेरक मयूर राऊत यांनी केले. यावेळी सरपंच किशोर गावडे, पोलिस पाटील जितेंद्र कवडो, अंगणवाडी सेविका मंदा मडावी, मुख्याध्यापक बनसोड उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here