गडचिरोली : २ लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या जहाल महीला नक्षलीस अटक

1228

– गडचिरोली पोलीस दलास नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर यश
The गडविश्व
गडचिरोली, ४ ऑगस्ट : गडचिरोली पोलीस दलास नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर जहाल महिला नक्षली मुडे हिडमा मडावी ला अटक करण्यात यश आले आहे.
२८ जुलै ते ०३ ऑगस्ट दरम्यान नक्षलीशहीद सप्ताह साजरा करीत असतात . या पार्श्वभुमीवर नक्षल्यांकडून सरकारविरोधी कार्यक्रम राबवुन हिंसक कारवाया घडवुन आणत असतात. अशा नक्षल्यांच्या हिंसक कारवायांवर आळा घालण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने नक्षलविरोधी अभियान तिव्र केले असुन, पोस्टे, उपपोस्टे व पोमके मार्फत जिल्हयाच्या विविध भागात नाकाबंदी करण्यात आली. काल ०३ ऑगस्ट २०२२ रोजी पोलीस उपविभाग एटापल्ली अंतर्गत पोलीस स्टेशन एटापल्ली येथील पोलीस पथकाने नाकाबंदी केली असता, एक महीला संशयीतरित्या मिळुन आल्याने जवानांनी महीला पोलीसांमार्फत तिची अधिक चौकशी केली. दरम्यान तिने सोबत बाळगलेल्या साहीत्यावरुन ती जहाल महीला नक्षली मुडे हिडमा मडावी कसनसूर दलम सदस्य असल्याचे समजले. त्यावरुन जवानांनी तिला ताब्यात घेवुन अटक केली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख सा., अपर पोलीस अधीक्षक अहेरी अनुज तारे सा. यांचे नेतृत्वात करण्यात आली.
अटक करण्यात आलेली जहाल महीला नक्षली ही कसनसूर दलममध्ये सदस्य पदावर कार्यरत असुन ती छत्तिसगड राज्यातील सुकमा जिल्हयातील रहीवासी आहे. तिच्या नक्षली कारवाया व नक्षली प्रसारास आळा घालण्याकरीता महाराष्ट्र शासनाने तिचेवर ०२ लक्ष रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. तिचा किती गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे याचा तपास गडचिरोली पोलीस दल करीत आहे.
सदरची कारवाई करणाऱ्या जवानांचे मा. पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांनी कौतुक केले असुन, नक्षल्यांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here