गडचिरोली : २६ फेब्रुवारी पासून विदर्भस्तरीय खंजेरी भजन स्पर्धा व कीर्तन महोत्सवाचे आयोजन

91

The गडविश्व
गडचिरोली : येथील नवकीर्ती दुर्गा उत्सव मंडळ व चामोर्शी रोड मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने २६ व २७ फेब्रुवारी रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विदर्भस्तरीय खंजेरी भजन स्पर्धा व कीर्तन महोत्सवाचे आयोजन गडचिरोली शहरातील चामोर्शी मार्गावरील कमल-केशव सभागृहात करण्यात आले आहे.
सदर स्पर्धेचे उदघाटन २६ फेब्रुवारी रोजी प्रा. राजेश कात्रटवार यांच्या हस्ते दुपारी ४ वाजत होणार आहे. यावेळी सहउद्घाटक म्हणून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे तर अध्यक्षस्थानी डॉ. शिवनाथ कुंभारे उपस्थित राहणार आहे. २७ फेब्रुवारीला रात्रो १० वाजता मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम स्वरुपात बक्षिसे वितरित करण्यात येणार आहे.
सदर स्पर्धेत इच्छूक भजन मंडळांनी सहभाग घ्यावा तसेच नागरिकांनी उपस्थतीत दर्शवून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here