

– स्वयं रक्तदाता गडचिरोली जिल्हा समितीचा पुढाकार
THE गडविश्व
गडचिरोली : स्वयं रक्तदाता गडचिरोली जिल्हा समितीच्या वतीने मिलिंदभाऊ भानारकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन काल ५ जानेवारी २२ रोजी महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे करण्यात आले होते. या शिबिरात एकूण १६ रक्तदाते यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. त्यात योगेश मशाखेत्री, आशिष पंदिलवार, आशिष मोगरकर, देवेंद्र निकुरे, रवींद्र पिपरे, महेंद्र पिपरे, अजय निकोडे, राजू उईके, कैलास सोनूले, पंकज फाले, अझेरुद्दीन बुखारे, राजन रामावत, दानू सिडाम, सचिन उमरे, विनोद तीम्मा व समीर उंदिरवाडे यांनी रक्तदान केले.
शिबीराच्या यशस्वीतेकरिता मिलींद भानारकर, गजानन नैताम, मनोज पिपरे अनिल भोयर, सूचित काळे, विश्वनाथ वैरकर, छत्रपती गावतुरे करण साखरे, सतीश तडकलवार (PRO), समता मॅडम, स्नेहा वैरागडे व नानुभाऊ यांनी मोला लाचे सहकार्य केले.
– रक्तदान करण्याकरिता ग्रामीण भागात जनजागृती करण्याकरिता प्रशासनाने पुढाकार घ्यावे. त्यामुळे रक्तदाते जास्तीत जास्त तयार होतील.
-मनोज पिपरे
सचिव स्वयं रक्तदाता समिती
गडचिरोली

