गडचिरोली शहरात शिवसेनेच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

274

The गडविश्व
गडचिरोली : शिवसेना शहर शाखेच्या वतीने काल २१ मार्च रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंती सोहळ्याने शहर दुमदुमून गेले होते.
शिवजयंती निमित्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅली ही विसापूर येथून काढण्यात आली व त्यानंतर चामोर्शी मार्गावर ही रॅली येऊन पोहचली. तसेच शिवसेना जिल्हा कार्यालयातून शिवसेना पदाधिकारी यांच्या नेतृत्वात भव्य शिवजयंती रॅली काढण्यात आली होती. शिवजयंती सोहळ्यात पुरुष व महिला ढोल ताशे पथक, तलवारबाजी, घोडे तसेच गोंडी नृत्य सादर करून मिरवणूकित महिला व पुरुषांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.
यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक किरण पांडव, जिल्हा प्रमुख वासुदेव शेडमाके, विधानसभा संघटक नंदु कुमरे, उपजिल्हा प्रमुख राजु कावळे, शहर प्रमुख रामकिरीत यादव, यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. मिरवणूकीची सुरुवात शिवसेना जिल्हा कार्यालयातून सुरू झाल्या नंतर इंदिरा गांधी चौक, त्रिमूर्ती चौक, गांधी चौक,बेसिक शाळा, वंजारी मोहल्ला, विठ्ठल मंदिर, श्रीराम मंदिर, आरमोरी रोड ते इंदिरा गांधी चौकातून परत शिवसेना जिल्हा कार्यालयात येऊन पोहोचली. शिवजयंती मिरवणूक निमित्य छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा शहरातील जनतेचा केंद्रबिंदू ठरला. या मिरवणुकीदरम्यान माजी जिल्हा परिषद सदस्या बांधकाम सभापती छायाताई कुंभारे, माजी नगराध्यक्षा डॉ. अश्विनी रामकिरीत यादव, सुनील पोरेड्डीवार, ज्ञानेश्वर बगमारे, संजय आकरे, नवनाथ उके, वैभव धात्रक, उदय धकाते, दिलेश सुरकर, चेतन कंदुकवार,अथर्व कापकर, दत्ता कुमरे, वसुधा धात्रक, शकुन नंदनवार , अनिता वैरागकर, सीमा पाराशर कालिंदी कडवे,नूतन कुंभारे, सुनंदा आतला, मयुरी, प्रिया, निकिता, नंदा राऊत, गायत्री,मनीष, विशाल, अनिकेत, गणेश, जय, निखाडे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शेकडो नागरिकांनी रॅलीचा आस्वाद घेतला. व रॅलीमुळे शहर दुमदुमून गेले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here