गडचिरोली शहरातील पाणीपुरवठा दोन दिवस राहणार बंद

1316

– नगरपरिषेदेची माहिती

The गडविश्व
गडचिरोली : नगर परिषदेअंतर्गत मुख्य पाईपलाईनचे काम सुरू असल्याने गडचिरोली शहरातील पाणीपुरवठा पुढील दोन दिवस ४ व ५ मे रोजी बंद राहणार आहे. असे नगर परिषदेच्या वतीने शहरवासीयांना कळविण्यात आले आहे. यामुळे आता गडचिरोलीकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.
गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौक चामोर्शी मार्गावरील ४५० एमएस रायझिंग मुख्य पाईप लाईनचे शिफ्टिंगचे काम सुरू आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा ४ व ५ मे रोजी बंद ठेवण्यात येणार आहे असल्याचे मुख्याधिकारी यांनी कळविले आहे. सतत दोन दिवस पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here