गडचिरोली : वाघाने आज पुन्हा केली इसमाची शिकार

1638

– धुंडेशिवनी जंगल परिसरातील घटना

The गडविश्व
गडचिरोली : जिल्हा मुख्यालयाजवळील दिभना येथे दोन दिवसापूर्वी वाघाने हल्ला करून इसमाला ठार केल्याची घटना ताजी असतांनाचा आज पुन्हा २८ जुलै रोजी वाघाने इसमाला ठार केल्याची घटना पोर्ला वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या धुडेशिवणी जंगल परिसरात दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. खुशाल निकुरे वय (अंदाजे ६० वर्ष) रा. धुंडेशिवणी असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, खुशाल निकुरे हे आपल्या इतर दोन साथीदारांसह जंगल परिसरात गुरे चराईकरिता गेले होते. दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला करून नरडीचा घोट घेतला. यावेळी इतर दोन साथीदारांनी आरडाओरड केल्याने वाघाने जंगलाच्या दिशेने धुम ठोकली. मात्र खुशाल निकुरे यांचा मृत्यू झाल्याचे आढळले. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे. सदर घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आाहे. २६ जुलै रोजी दिभना येथील निलकंठ मोहुर्ले यांना वाघाने ठार केल्याची घटना ताजी असतांनाच आज पुन्हा तशीच घटना घडल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. वनविभाने जंगल परिसारत वाघाचा वावर असल्याने नागरिकांना जंगलात जाण्यास तंबी दिली असतांनाही वनविभागाच्या सुचनाकडे नागरिक दुर्लक्ष करित आहे. मागील वर्षीही याच परिसरात वाघाने धुमाकुळ माजवला होता. सतत अश्याप्रकारच्या घटना घडत असल्याने वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरीकातून होत आहे.

#tiger #tigerattack #gadchiroli #porla #forest

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here