गडचिरोली : आज पुन्हा वाघाचा हल्ला, इसमाचा बळी

2033

– दोन दिवसातील दुसरी घटना
The गडविश्व
गडचिरोली, ९ सप्टेंबर : जिल्हयातील देसाईगंज तालुक्यात वाघाने हल्ला करून इसमास ठार केल्याची घटना ताजी असतांनाच पुन्हा गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून २० किमी अंतरावर असलेल्या कळमटोला (अमिर्झा) जंगल परिसरात गुरे चारतांना वाघाने हल्ला करून इसमास ठार केल्याची घटना आज ९ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली आहे. जिल्हयात दोन दिवसातील ही दुसरी घटना आहे. सदर घटनेने परिसरात भितीचे वातावरण आहे. कुष्णाजी महागु ढोणे (६५) असे मृतकाचे नाव आहे.
मृतक ढोणे हे गावालगतच्या जंगल परिसरात गुरे चारण्याकरिता गेले असता वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ठार केल्याचे कळते. घटनेची माहिती वनविभागाल देण्यात आली आहे. मृतकाच्या पच्छात बराच मोठा आप्त परिवार आहे. सदर घटनने गावात शोककळा पसरली आहे.
तर जिल्हात सातत्याने अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने नरभक्षी वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणीही सातत्याने करण्यात येत आहे. वनविभागाच्या वतीने नरभक्षी वाघास जेरबंद करण्यात ताडोबा येथून शापशूटर दाखल झाले आहे तसेच जंगल परिसरातील नागरिकांना जंगलात जाण्यात तंबी देण्यात येत असूनही नागरिक जंगलात प्रवेश करीत असल्याने अशा घटना समोर येत आहे तर नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यासही अडचण होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here