गडचिरोली : वाघाच्या हल्ल्यात इसम ठार, परिसरात खळबळ

3220

– दिभना येथील घटना, नागरिक दहशतीत
The गडविश्व
गडचिरोली, २३ जुलै : जिल्हा मुख्यालयापासून जवळच असलेल्या दिभना जंगल परिसरात बैल चराई साठी नेलेल्या इसमावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज मंगळवार २६ जुलै रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. निलकंठ गोपाळा मोहूर्ले (५५) असे मृतक इसमाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक निलकंठ मोहूर्ले हा आपल्या इतर पाच साथीदारासह जंगल परिसरात गुरे चराईकरीता गेला होता. दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला असता या हल्ल्यात निलकंठ मोहूर्ले ठार झाले. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे. सदर घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. मागील वर्षी या परिसरात वाघाने धुमाकूळ माजवत अनेक नागरिकांच्या नरडीचा घोट घेतला होता. त्यादरम्यान वाघाला जेरबंद करण्यासाठी मोठे आंदोलनही करण्यात आले होते. आता सदर घटना घडल्याने नागरिक पुन्हा दहशतीत असून वनविभाग काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर घटनेबाबत गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये संपर्क केला असता बातमी लिहेस्तव कोणतीहि नोंद केली नसल्याचे कळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here