गडचिरोली : वसतिगृहातील विद्यार्थीनिची गळफास घेवून आत्महत्या

667

The गडविश्व
अहेरी : तालुक्यातील जिमलगट्टा येथील शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थीनीने वसतिगृहात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सदर घटना २ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडल्याचे कळते. मंजुळा रामा मडावी (१७) रा. रमेशगुडम ता. सिरोंचा जि. गडचिरोली असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थीनीचे नाव आहे.
मृतक मंजुळा ही सिरोंचा तालुक्यातील रमेशगुडम येथील रहिवासी असून ती जिमलगट्टा येथील शासकीय आश्रम शाळेत इयत्ता अकराव्या वर्गात शाळेतीलच वसतिगृहात राहून शिक्षण घेत होती. दरम्यान काल २ मार्च रोजी मध्यरात्री तिने वसतिगृहातील बाथरूमध्ये गळफास घेवून आत्महत्या केल्याचे इतर विद्यार्थींनीना निदर्शनास आले. लागलीत विद्यार्थींनीनी घटनेची माहीती अधीक्षीकांनी दिली. अधिक्षीकांनी मुख्याध्यापक यांना माहीती देताच मुख्याध्यापकासह शाळेतील सर्व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मुख्याध्यापक यांनी घटनेची माहीती जिमलगट्टा पोलीसांना कळवताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. विद्यार्थीनीच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही पुढील तपास जिमलगट्टा पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here