गडचिरोली : रानडुकराची शिकार, तिघेजण ताब्यात

2771

– चातगाव वनपरिक्षेत्रातील घटना
The गडविश्व
गडचिरोली, १५ जुलै : जिल्ह्यातील चातगाव वनपरिक्षेत्रातील कार्यालय अंतर्गत नियतक्षेत्र अमिर्झा येथील कक्ष क्रमांक ४१५ मध्ये डुकराची शिकार केल्याप्रकरणी तिघीजनांना ताब्यात घेण्यात आले आहे.
हेमंत मडावी, डंभाजी जराते, श्याम जराते सर्व रा. धुंडेशिवनी असे आरोपींची नावे आहेत.
चातगाव वनपरिक्षेत्रातील कार्यालय अंतर्गत नियतक्षेत्र अमिर्झा येथील कक्ष क्रमांक ४१५ मध्ये डुकराची शिकार केल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाली असता अमिर्झा वनपरिक्षेत्रातील भिकरमौशि ते बोथेडा रस्त्यावर सापळा रचून आरोपींना शिकारिसह पकडण्यात आले. आरोपींनी रानडुकराची शिकार खाण्याकरिता व मास विक्रीच्या बेताने केल्याचे चौकशीत उघडकीस आले. तसेच या प्रकरणात अधिक आरोपी असल्याचे निष्पन्न झाले असून आरोपींचा शोध घेणे सुरू आहे.
आरोपींविरुद्ध वन्यप्राणी शिकार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई, उपवनरक्षक मिलिश दत्त शर्मा, सहाय्यक वनरक्षक सोनल भडके यांच्या मार्गदर्शनात, वनपरिक्षत्र अधिकारी संजय पडवे यांच्या नेतृत्वात उपक्षेत्रातील वनाधिकाऱ्यांनी केली.
पुढील तपास उपवनरक्षक मिलिश दत्त शर्मा, सहाय्यक वनरक्षक सोनल भडके यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. सदर कारवाई करिता क्षेत्र सहाय्यक राकेश तांबे, संदीप आबेडारे, सिद्धार्थ मेश्राम, वनरक्षक रुपेश मेश्राम, राजू दुर्गे, रुपेश आनंदपवार, गजानन सिडाम, राजू तूमरेटि, अंकुश मडावी, वनमजुर आदींनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here