गडचिरोली : रानटी हत्तींच्या कळपाचे जिल्ह्यात पुनरागमन

2948

– नागरिक पुन्हा दहशतीत
The गडविश्व
देसाईगंज, १५ ऑक्टोबर : छत्तीसगढ मार्गे गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश केलेल्या रानटी हत्तींच्या कळपाने काही दिवस वडसा वनविभागात उत्पात माजवत गोंदिया जिल्ह्याकडे मार्गक्रमण केले होते मात्र आता पुन्हा हा कळप परत वडसा वनविभागात प्रवेश केल्याने नागरिक दहशतीत आहेत. कुरखेडा तालुक्यातील चारभट्टी,सिंदेदूर शेतशिवारत या हत्तींनी नासधूस केल्याचे कळते.
गडचिरोली जिल्ह्यात मानव व वन्यजीव संघर्ष शिगेला पोहचलेला दिसत आहे. जिल्ह्यात धुमाकूळ माजवणाऱ्या नरभक्षी वाघाने अनेकांचे बळी घेतले. तसेच रानटी हत्तींच्या कळपाने धुमाकूळ माजवत शेतपिकांची, घरांची नासधूस केली. काही दिवसांपूर्वी रानटी हत्तींचा कळप गोंदिया जिल्ह्यात वळला होता मात्र आता पुन्हा गडचिरोली जिल्ह्यात कळपाने पुनरागमन केल्याने नागरिक दहशतीत आहे. कुरखेडा तालुक्यातील चारभट्टी, सिंदेसूर शेतशिवारत या कळपानेhatti प्रवेश करत शेतपिकांचे नुकसान केले आहे. यामुळे आता नरभक्षी वाघाच्या दहशतीत असलेले नागरिक वाघाला जेरबंद केल्यानंतर दहशतीतून बाहेर निघाले असले तरी आता पुन्हा रानटी हत्तींच्या पुनरागमनाने नागरिक दहशतीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here