– बांधकाम अवैध असल्याचा आरोप
The गडविश्व
गडचिरोली ७ जलै : शहरातील चामोर्शी मार्गावर असलेल्या जंगल कामगार सोसायटीच्या जागेवर उभारण्यात आलेला पेट्रोल पंप वादाच्या भोवऱ्यात अडकला असून सदर पेट्रोल पंपाचे बांधकाम अवैध असल्याचा आरोप जंगल कामगार सहकारी संस्थेचे सदस्य नारायण धकाते यांनी केला आहे.
जिल्हा जंगल कामगार संघाची संपुर्ण मालमत्ता गाव पातळीवर असलेल्या २६ जंगल कामगार संस्थांच्या मालकीची आहे. पेट्रोल पंप टाकण्यासाठी जिल्हा जंगल कामगार संघाने आलापल्ली येथील हनुमंत गंगाधर मडावी यांना १२ एप्रिल २०१९ रोजी २० वर्षाकरीता कार्यालय परिसरातील जागा लिजवर दिली आहे. मात्र हनुमंत मडावी हे जिल्हयातील कोणतत्याही जंगल कामगार संस्थेचे प्राथमिक सदस्य नाहीत. त्यामुळे त्यांना भडयाने जागा देत येत नाही असा आरोप धकाते यांनी केला आहे. धकाते यांनी याबाबत जिलहा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कडे तक्रार केली होती. दोन्ही बाजुंचे म्हणणे ऐकल्यानंतर २८ जून २०२२ रोजी जिल्हा उपनिबंधक पी.एस.धोटे यांनी काही निर्देश दिले आहेत. त्यात गडचिरोली जिल्हा जंगल कामगार सहकारी संघाने पेट्रोल पंपाकरीता दिलेली जागा सहकारी संस्थेच्या अधिनियमाचे उल्लघन करणारी आहे. तसेच लग्न सभागृह बांधकामाकरिात यापूर्वी नगर परिषदेकडे ५ लाख २ हजार १९६ रूपये अनामत भरले होते. याचाही भुर्दंड संस्थेवर बसला आहे. या रकमेचा भरणा संबंधित संचालकांकडून करण्यात यावा. दिलेल्या निर्देशानुसार १० दिवसाच्या आत कार्यवाही करून तसा अहवाल सादर करण्याचे निर्देश धोटे यांनी दिले आहे. कार्यवाही न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा धकाते यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे. पत्रकार परिषदेला आनंदराव कोवासे, डोनू हिचामी, जगन्नाथ शेडमाके, गणपतराव पंदिलवार, लालसू पावे उपस्थित होते.
