गडचिरोली पोलीस दल व रोटरी क्लबच्या वतीने २७५ नागरिकांवर उपचार ; ८६ रुग्णांवर होणार नागपूरात उपचार

191

– पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील आजारी नागरीकांचा भव्य आरोग्य तपासणी महामेळावा संपन्न
The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्यात वैद्यकिय सुविधेच्या अभावामुळे तसेच आर्थिक परिस्थीतीच्या कारणामुळे जिल्ह्यातील रुग्णांना आपल्या प्रकृतीचा उपचार वेळेवर करता येत नाही. अशा आजारी नागरीकांच्या दुर्धर आजाराची तपासणी करून त्यांना योग्य उपचार मिळावा याकरिता पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांचे संकल्पनेतून पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून गडचिरोली पोलीस दल व रोटरी क्लब नागपूर साऊथ ईस्ट यांचे संयुक्त विद्यमाने पोलीस मुख्यालय, गडचिरोली परिसरातील एकलव्य धाम येथे बुधवार ११ मे २०२२ रोजी अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील आजारी नागरीकांकरिता भव्य आरोग्य तपासणी महामेळावा पार पडला.
सदर महामेळाव्यात गडचिरोली जिल्ह्यातील १० पोलीस उपविभागातील पोस्टे, उपपोस्टे, पोमकें हद्दीतील २७५ आजारी नागरिकांची वैद्यकिय तपासणी करून त्यांचेवर उपचार करण्यात आले. तसेच ज्या रुग्णावर वेळीच उपचार करणे शक्य नाही, अशा ८६ रुग्णांना नागपूर येथील मोठ्या रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहे. याकरीता रोटरी क्लब, नागपूर यांच्या माध्यमातुन प्रसुती रोग तज्ञ, बालरोग तज्ञ, कान-नाक-घसा तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, शल्य चिकित्सक, त्वचारोग तज्ञ, मुखरोग तज्ञ तसेच फिजीशियन इ. वैद्यकिय तज्ञ उपलब्ध करुन देण्यात आले होते. यावेळी रुग्णांना संबोधित करतांना पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांनी सांगितले की, आम्ही जिल्हयातील सर्व सणांना त्यांच्या विविध आजारावर उपचार करणेसाठी प्रयत्न करणार आहोत तसेच पोलीस दलामार्फत जेवढे प्रयत्न आम्हाला करता येईल तेवढे प्रयत्न करून तुम्हाला आजारमुक्त व निरोगी करण्याचा आम्ही प्रयत्न करु. आपल्या सर्व समस्या दूर व्हाव्यात यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करीत आहोत.
यापूर्वीही गडचिरोली पोलीस दल व रोटरी क्लब, नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी पोलीस उप मुख्यालय, प्राणहिता येथे नेत्र तपासणी शिबीर आयोजीत करण्यात आले होते. त्यात ७०९ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली होती. सदर शिबीरात रुग्णांना आवश्यकतेनुसार नेत्र रोगासंबंधी विविध साहीत्याचे वाटप करण्यात आले. आचार्य विनोबा भाव ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे), वर्धा येथे १३३ नागरिकांची नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आली. गुंतागुंतीच्या ०७ रुग्णांना अर्थ सहाय्यनुरुप सहकार्य करून त्यांची अतिरीक्त शस्त्रक्रिया पार पाडण्यात आली. सदर आरोग्य तपासणी महामेळावा आयोजीत करण्यात आल्याने बऱ्याच आजारावर उपचार करता आल्याची बाब रुग्णांनी बोलून दाखविली व पोलीस विभागाचे आभार मानले. गडचिरोली पोलीस दलातर्फे आजपावेतो ७७८ व्यक्तींना युडीआयईडी कार्ड, तसेच २३५ दिव्यांग व्यक्तींना समाज कल्याण व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांचे सहकार्यातुन बसप्रवास सवलत योजनेचे ओळखपत्र मिळवून देण्यात आले आहेत.
आजपर्यंत गडचिरोली पोलीस प्रशासनाकडुन दिव्यांगासाठी आरोग्य शिबीर राबवुन ९८० दिव्यांगाना युडीआयडी कार्ड, ६५० दिव्यांगाना एसटी प्रवास सवलत योजनेचे प्रमाणपत्र, २७६ दिव्यांगांचे संजय गांधी निराधार योजनेचे प्रस्ताव पाठविण्यात आलेले आहेत. तसेच रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याद्वारे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन सुरक्षा रक्षक ४८४, नर्सिंग असिस्टंट ११४३, हॉस्पीटॅलीटी २९६, ऑटोमोबाईल २५४, इलेक्ट्रीशिअन १४२, प्लंम्बींग २७, वेल्डींग ३३, जनरल डयुटी असिस्टंट ३८, फील्ड ऑफीसर ११ तसेच व्हीएलई ४५ असे एकुण २४७३ युवक / युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
तसेच कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन (आत्मा) सोनापुर, गडचिरोली व बीओआयआरसेटी गडचिरोली यांचे मार्फत ब्युटीपार्लर १०५ मत्स्यपालन ६० कुक्कुटपालन ४४४, बदक पालन १०० शेळीपालन ६७, शिवणकला १०५ मधुमक्षिका पालन ३२, फोटोग्राफी ३५, भाजीपाला लागवड ४५०, पोलीस प्रशिक्षण ७८०, व्हिलर दुरुस्ती ३४, फास्ट फुड ३५, पापड लोणचे ३०, टु/फोर व्हिलर प्रशिक्षण ३७० असे एकुण २७३७ युवक-युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले आहे.
सदर आरोग्य तपासणी महामेळाव्यास मा. पोलीस अधीक्षकअंकित गोयल सा. यांच्या संकल्पनेतुन व मार्गदर्शनाखाली पार पडला असून कार्यक्रमासअप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक, अहेरी अनुज तारे सा., डॉ. ईक्बाल बेग (मेडीसीन), डॉ. अखिलेश कांबळे (सर्जन / शल्यचिकीत्सक), डॉ. संदीप उपाध्ये (सर्जन), डॉ. गायत्री काळे (स्त्री रोग तज्ञ), डॉ. आकाश दौड (बालरोग तज्ञ), डॉ. वृषभ कुंभारे (अस्थीरोग तज्ञ), डॉ. ऐश्वर्या विजयपाल (कान-नाक-घसा तज्ञ), डॉ. सुरज (नेत्र रोग तज्ञ), डॉ. श्रेयस (नेत्ररोग तज्ञ), डॉ. निधी पुगलीया (त्वचारोग तज्ञ) व डॉ. रामनाथ रेवतकर (मुखरोग तज्ञ) हे उपस्थीत होते.
महामेळाव्याच्या यशस्वीतेकरिता सर्व उपविभागिय पोलीस अधिकारी, सर्व प्रभारी अधिकारी, पोस्टे/ उपपोस्टे/पोमकं तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि.महादेव शेलार, सपोनि. भावेश कावरे व त्यांचे सर्व पोलीस अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here