गडचिरोली : पेरमिली नाल्यावरून ५ ते ६ प्रवासी असणारा ट्रक वाहून गेला

4117

– गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने काही भागात पूरस्थिती
The गडविश्व
गडचिरोली, १० जुलै : गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने काही भागात पूरस्थिती निर्माण झाली असून च काही मार्ग सुद्धा बंद आहेत. अशातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ५ ते ६ प्रवासी असणारा एक ट्रक काल ९ जुलै रोजी रात्रो अंदाजे ९.३० ते १० वाजताच्या सुमारास पेरमिली नाल्यावरून वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. आज रविवार १० जुलै रोजी सकाळी त्या ट्रक मध्ये ३ मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती असून स्थानिक SDRF व पथकामार्फत इतरांचा शोध सुरू आहे.

प्रशासनाला माहिती मिळताच तालुका व गावस्तरावरील यंत्रणा पाहटे पासून सदर घटनेबाबत शोधमोहिम राबवित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here