गडचिरोली : पुष्कर मेळावा नियोजनाचा पोलीस अधीक्षकांनी घेतला आढावा

317

– १२ वर्षानंतर भरतो पुष्कर मेळावा, लाखो भाविकांची उसळणार गर्दी
The गडविश्व
गडचिरोली : बारा वर्षानंतर एकदाच होणाऱ्या तसेच लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पुष्कर यात्रेनिमित्त सिरोंचा तालुक्यातील बारमाही वाहणाऱ्या प्राणहिता नदी पात्रात मोठी जत्रा भरणार आहे. या यात्रेकरिता भाविकांची गर्दी उसळणार असून ही गर्दी लक्षात घेता पोलीस अधीक्षक अंकित गोयल व इतर अधीकाऱ्यांनी सिरोंचा गाठून प्राणहिता नदी घाटाचे निरीक्षण केले. यावेळी त्यांनी यात्रेच्या नियोजनाचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश दिले.
यावेळी एप्रिल महिन्यात पुष्कर यात्रेचा योग आला आहे. जिल्हयातील सिरोंचा तालुक्यातील बारमाही वाहणाऱ्या प्राणहिता नदी पात्रात सदर यात्रा भरणार आहे. प्रत्येक १२ वर्षानंतर एका नदीत पुष्कर योग येत असल्याचे सांगितल्या जाते. यावेळी प्राणहिता नदीला पुष्कर योग प्राप्त झाला आहे. पुष्कर निमित्त १२ दिवस यात्रा भरविली जाते. या कालावधीत लाखो भाविक नदीत पवित्र स्नान करण्याकरिता नदी घाटावर पोहचत असतात. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाव्दारे केल्या गेलेल्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी सिरोंचाचा दौरा करीत प्राणहिता नदी घाटाचे निरीक्षण केले. यावेळी त्यांनी यात्रेनिमित्त करण्यात आलेल्या नियोजनाचा आढावा घेत संबंधित सर्व विभाागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करीत योग्य ते निर्देश दिले. याप्रसंगी अपर पोलीस अधिक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे आदींसह संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान तिनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बालाजी देवस्थानाला भेट दिली व त्यांनंतर प्रसिध्द असलेल्या तेलंगणा राज्यातील कालेश्वर मुक्तेश्वर देवस्थानाला सुध्दा भेट देवून दर्शन घेतले. यावेळी कालेश्वरर देवस्थान समितीने तिन्ही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा वस्त्र देवून सन्मान केला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी शिंदे, पोलीस निरीक्षक जाधव, पोलीस उपनिरीक्षक कांदे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here