– वाघाचे मानवावरील हल्ले थांबता थांबेना
The गडविश्व
गडचिरोली, ३ नोव्हेंबर : जिल्ह्यात वाघाचे इसमावरील हल्ले थांबता थांबेना, तालुक्यातील राजगाटा चक शेतशिवारात स्वतःचे बैल राखत असतांना वाघाने हल्ला करून इसमास ठार केल्याची घटना आज ३ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. सुधाकर उरकुडा भोयर (अंदाजे वय ५०) राजगाटा चक असे मृतक इसमाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, सुधाकर भोयर हे आपल्या शेतशिवारात बैल राखत होते. दरम्यान वाघाने त्यांच्यावर झडप घेऊन नरडीचा घोट घेत ठार केले. यांच्या मृत्यूने भोयर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे. घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून या परिसरातील ही तिसरी घटना असल्याचे बोलल्या जात आहे. या परिसरात नरभक्षी वाघाने धुमाकूळ माजवत आतापर्यंत अनेकांचा बळी घेतला आहे. वाघास जेरबंद करण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिक वारंवार करीत आहे मात्र वनविभाग यात अपयशी ठरत आहे. सदर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे.

#tigerattack #gadchiroli news # forest #tiger