गडचिरोली : पुढील तीन दिवस नळाच्या पाण्याचा वापर करू नये

2638

– गडचिरोली नगर परिषदेच्या वतीने शहरातील काही परीसरातील नागरिकांना आवाहन

The गडविश्व
गडचिरोली : शहरातील चामोर्शी मार्गावरील पाईप लाईन मध्ये इसमाचा मृतदेह शुक्रवारी आढळला होता. सदर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. त्यातच काल १३ जून रोजी सायंकाळच्या सुमारास नळाद्वारे मासाचे तुकडे आढळले याबाबत आज वृत्त प्रकाशित होताच नगर परिषदेच्या वतीने उद्या १५ ते १७ जून पर्यंत तसेच पुढील आदेशपर्यंत पाण्याचा वापर करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
शुक्रवार १० जून रोजी शहरातील पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या पाईप मध्ये इसमाचे मृत शरीर कुजलेल्या अवस्थेत आढळले. सदर घटनेनंतर नगर परिषदेमार्फत जलकुंभ साफ करून पाण्याच्या वॉलमधून देखील पाणी सोडण्यात आले. मात्र काल १३ जून रोजी नळाद्वारे सोडण्यात आलेल्या पाण्यामध्ये मासाचे तुकडे आढळल्याची धक्कादायक बाब समोर आली. व सदर घटनेबाबत आज वृत्त प्रकाशित होताच नगर परिषदेच्या वतीने पुढील तीन दिवस १५ ते १७ जून पर्यंत नळाच्या पाण्याचा वापर करू नये असे आवाहन पत्रकाद्वारे नागरिकांना करण्यात आले हे विशेष.
शहरातील गोकुलनगर, चनकाईनगर, वीर बाबुराव शेडमाके चौक परिसर, आशीर्वाद नगर, गणेश नगर, पाण्याच्या डिस्ट्रिब्युशन पाईप लाईन मध्ये मृतदेहाचे अवशेष सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे नागरिकांनी पुढील ३ दिवस नळाचे पाणी वापरण्यात येऊ नये. सदर लाईनचे वॉशिंग सुरू असल्याने आपल्या घरातील नळ खुले करून ठेवावे, नगर परिषदेमार्फत तीन दिवसानंतर पाण्याची तपासणी करण्यात येईल व तपासणी अहवालानंतर पिण्याकरिता पाणी योग्य असल्याबाबत मुनादी द्वारे कळवण्यात येईल त्यानंतरच पाण्याचा वापर नागरिकांनी करावा व यावेळेत नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून नगर परिषदेच्या मार्फत टँकरने पाणी पुरवठा करण्यात येईल असे नगर परिषदेचे मुख्याधिकारी वाघ यांनी पत्राद्वारे कळविले आहे.

नळाद्वारे आलेले मासाचे तुकडे असलेले सॅम्पल मुख्याधिकारी यांच्याकडे सुपूर्द

ज्या नागरिकांच्या घरी नळाद्वारे मासाचे तुकडे आले त्याघरी शहरातील काही पत्रकारांनी प्रत्यक्ष भेट देऊन मासाचे तुकडे एक भरणीमध्ये सॅम्पल म्हणून जमा करून ठेवले होते. व उपविभागीय अधिकारी तथा नगर परिषदेचे प्रशासक अंकित यांच्या समक्ष नगर परिषदेचे मुख्याधिकारी वाघ यांना सुपूर्द करण्यात आले.

उपविभागीय अधिकारी तथा नगर परिषदेचे प्रशासक अंकित यांचे गडचिरोली शहरातील नागरिकांना पाणी वापराबाबत आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here