गडचिरोली : नक्षल्यांनी केली इसमाची गोळी झाडून हत्या

1674
File Photo

– एटापल्ली तालुक्यातील गर्देवाडा येथील घटना
The गडविश्व
गडचिरोली, ९ नोव्हेंबर : जिल्ह्यात नक्षल्यांनी पुन्हा डोके वर काढत एटापल्ली तालुक्यातील गर्देवाडा येथे इसमाची गोळी झाडून हत्या केल्याची घटना सोमवारी रात्रोच्या सुमारास घडली. दिलीप उर्फ नितेश गज्जू हिचामी (२५) रा.झुरी ता.एटापल्ली जि.गडचिरोली असे हत्या करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. सदर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
उपविभाग कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या पोलीस मदत केंद्र मालेवाडा हद्दीमध्ये ११ ऑक्टोबर रोजी लड्डेरा (हेटाळकसा) जंगल परिसरात नक्षल्यांनी पोलिसांना पथकांना नुकसान पोहचून मोठा घातपात करण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात दारुगोळा, स्फोटक व इतर साहित्य पुरून पुरून ठेवले असल्याच्या गोपनिय माहितीच्या आधारे विशेष अभियान पथक गडचिरोली व बी.डी.डी.एस. पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना एका संशयीत ठिकाणी लपवुन ठेवलेले स्फोटके व इतर साहित्य शोधुन काढण्यात गडचिरोली पोलीस दलाच्या जवानांना यश आले.
दरम्यान आता नक्षल्यांनी पुन्हा डोके वर काढत सोमवारी रात्रोच्या सुमारास एटापल्ली तालुक्यातील गर्देवाडा येथे झुरी येथील रहिवासी दिलीप हिचामी याची गोळी झाडून हत्या केली. मंगळवारी सकाळच्या सुमारास दिपलीपचा मृतदेह आढळून आला असून या हत्येनंतर नक्षल्यांनी दिलीपच्या मृतदेहावर पत्रक टाकले होते अशी माहिती आहे. पत्रकात दिलीप हा २०११ साली नक्षल चळवळीमध्ये दाखल झाला होता, २०२२ पर्यंत त्याने विविध दलममध्ये काम केले तसेच डिव्हीसीएम शंकरराव याच्या मृत्यूला तो कारणीभूत होता त्यामुळे त्याला शिक्षा झाली पाहिजे असे पत्रकात नक्षल्यांनी म्हटले आहे.
सदर घटनेने परिसरात नक्षली सक्रिय असल्याचे बोलल्या जात असून घटनेने खळबळ उडाली आहे.

#gadchirolinews #naxal #murder #gadchirolipolice #eatpalli #gardewada

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here